माजी मंत्री सुरुपसिंग नाईक यांचे निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरुपसिंग नाईक (88) यांचे बुधवारी, 24 डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या महिनाभरापासून सुरुपसिंग नाईक यांची प्रकृती खालावली होती. मुंबई व गुजरातच्या बारडोली येथील गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांनी नवापूरच्या खासगी रुग्णालयात आज बुधवारी सकाळी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मूळ गावी नवागाव येथे उद्या गुरुवारी सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, नवापूर विधानसभेचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्यासह चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.