सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे

सरदार खंडेराव दाभाडे हे शाहू महाराजांच्या जवळचे सरदार. त्यांनी 1705 ते 1716 पर्यंत बडोद्यात मराठा साम्राज्याच्या सैन्याचे नेतृत्व केले. सातारा येथे परतल्यानंतर इ.स. 1717 मध्ये शिवाजी महाराजांचे नातू शाहूजी यांनी त्यांना सरदार सेनापती (सरसेनापती, डय़ूक) ही वंशपरंपरागत पदवी बहाल केली. खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने वसई ते सुरत हा कोकणातील प्रदेश काबीज केला होता. ए

का पत्रात खंडेराव यांच्याबद्दल शाहू महाराजांनी ‘बडे सरदार मातब्बर, कामकरी हुशार होते’ असा उल्लेख केला आहे. खंडेराव दाभाडे यांनी आपल्या पराक्रमाने मराठा साम्राज्याच्या वाढीत मोलाचा हातभार लावल्याने छत्रपती शाहू महाराजांच्या अत्यंत जवळच्या माणसांमध्ये त्यांची गणना होत असे.

त्यांना तळेगाव इनामात मिळाले होते. यामुळे पुढे ‘तळेगाव दाभाडे’, असे नाव पडले. इथल्या बनेश्वर मंदिर परिसरात झाडांच्या गर्द सावलीत सरसेनापती सरदार खंडेराव दाभाडे यांचे समाधी स्थळ आहे. समाधी मंदिराच्या जोत्यावर चारही बाजूंनी रामायण, महाभारत आणि समकालीन ऐतिहासिक प्रसंग कोरलेले आहेत. सुंदर प्रतिकं कोरली आहेत. अशीच प्रतिकं आणि प्रसंग छतपट्टीवरही कोरलेले आहेत.