उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर इन अ‍ॅक्शन, दर 15 दिवसांनी जनता दरबार

उरणवासीयांच्या समस्यांवर चर्चा करून त्या सोडविण्यासाठी १५ दिवसांतून एकदा जनता दरबार भरविण्यात येईल. त्याचबरोबरच नागरिकांचे प्रश्न तातडीने २४ तासांत निकाली काढण्यासाठी नवीन हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी केली. शिवसेना-राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या घाणेकर यांनी निवडून येताच उरणच्या विकासाचा अॅक्शन प्लॅनच जाहीर केला.

उरणच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जनतेने मोठ्या विश्वासाने उरणच्या विकासाचा भार सोपविला. जनतेने टाकलेल्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार नाही. उरण शहरवासीयांच्या मूलभूत, पायाभूत आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सहकाऱ्यांच्या सोबतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. लोकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली.

विकासकामांच्या आड येणाऱ्यांना बाजूला सारू

भावना घाणेकर यांनी विकासकामांच्या आड जो कोणी येईल त्याला बाजूला सारून कामे केली जातील. आगरी-कोळी-कराडी समाजाला नडणाऱ्यांना त्यांची औकात आणि आगरी हिसकाही दाखविणार असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

दिबांचे नाव; भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी लढा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबांचे नाव देण्याच्या भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने निव्वळ पोकळ वल्गनाच केल्या आहेत. विमानतळाला दिबांचे नाव व भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुद्यावर लवकरच लढा उभारला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली