यूएनच्या फंडिंगमध्ये अमेरिकेकडून कपात

 

संयुक्त राष्ट्राला दिल्या जाणाऱया फंडिंगमध्ये अमेरिकेकडून मोठी कपात करण्यात आली आहे. अमेरिका आता केवळ दोन अब्ज डॉलरची मदत देणार आहे, असे जाहीर केले आहे. अमेरिकेकडून संयुक्त राष्ट्राला दरवर्षी 17 अब्ज डॉलरची आर्थिक मदत दिली जात होती. यात 8 ते 10 अब्ज डॉलर हे स्वेच्छेने दिले जात होते, तर काही संयुक्त राष्ट्र सदस्यत्व म्हणून दिले जात होते.