हा तात्पुरता दिलासा ‘कायम’ व्हावा! आदित्य ठाकरे यांची अपेक्षा

अरावली प्रकरणातील न्यायालयाच्या निर्णयाचे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्वागत केले. ‘हा दिलासा मोठा असला तरी तात्पुरता आहे. तो कायमस्वरूपी मिळायला हवा,’ अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

‘राजस्थानातील लोकांनी उभारलेल्या जनआंदोलनाशिवाय हे शक्य झाले नसते. पृथ्वीला ओरबाडून खाण्याचे घाणेरडे मनसुबे त्यांनी हाणून पाडले. पृथ्वी आम्हाला किती महत्त्वाची आहे हेच त्यांनी दाखवून दिले. अरावली पर्वतरांग आणि एकूणच देशभरातील निसर्गाचे यापुढे मजबुतीने संरक्षण होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अरावलीची व्याख्या बदलून ती विकून टाकण्याचा सरकारचा हेतू आहे. त्यामुळे ती सुरक्षित असल्याचे दाखवण्यासाठी चाललेल्या अपप्रचाराला बळी पडू नका, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले.

नवी समिती घेणार आढावा

देशभरात होत असलेल्या विरोधाची सर्वोच्च न्यायालयाने ‘स्युमोटो’ दखल घेतली व पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येला स्थगिती दिली. अरावली पर्वताच्या अभ्यासासाठी एक नवी समिती बनवली जाईल. ही समिती केंद्र सरकारच्या व्याख्येचा पुन्हा आघेईल, असे सूर्य कांत यांनी स्पष्ट केले. याआधीचा निर्णय पुसुनावणीपर्यंत लागू होणार नाही, असेही सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सांगितले.