घशात खवखव होत असेल तर…

बऱयाचदा बदलत्या वातावरणामुळे घशात खवखव होते. जर तुम्हाला असे होत असेल तर सर्वात आधी कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळून गुळण्या करा. हे सूज आणि जीवाणू कमी करण्यास मदत करते. आले किंवा मेथीचा चहा प्या. हे दाह कमी करण्यास मदत करते.

गरम पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्या. मध घशाला आराम देतो आणि लिंबू रोगप्रतिकारशक्ती वाढवते. शरीराला आणि आवाजाला आराम द्या, ज्यामुळे लवकर बरे होण्यास मदत होईल. सूप, गरम पाणी आणि पॅफिन नसलेले चहा प्या, जे घशाला मॉइश्चराइज ठेवतात.