
नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री गिरीजा ओक गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंड होत आहे. गिरीजा आणि तिची ब्लू साडी सर्वांसाठी चर्चेचा विषय बनला आहे. गिरीजाचे साडीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले. तिचा फॅन फॉलोअर हा आता केवळ मराठीच माणूस राहिला नाही तर इतर भाषिकही गिरीजाचे फॉलोअर झाले आहेत. बॉलिवूडचा सुपरस्टारही तिच्यावरून नजर हटवू शकला नाहीये. 2004 मधील घडलेला हा प्रसंग आज चर्चेत आलाय. दिग्दर्शिका, निर्मात्या कांचन अधिकारी यांनी कोणालाही माहित नसलेला त्यावेळचा किस्सा सांगितला.
कांचन धर्माधिकारी यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखतीमध्ये एक रंजक माहिती दिली. या मुलाखतीत त्यांनी गिरीजा ओकच्या फॅन फॉलोईंगवर भाष्य केलं. 2004 साली मी ‘मानिनी’ पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. आम्ही तीन निर्माते होतो. तिघांनी मिळून पैसे जमवले आणि मानिनी केला. या चित्रपटाचे शुटिंग परदेशात झालं होतं. गिरीजा ओक आणि स्वप्नील जोशी हे या चित्रपटात काम करत होते. शुटिंग संपवून आम्ही दुबईवरुन येत होतो, तेव्हा विमानात इमरान हाश्मी होता. तेव्हा तो सुद्धा त्याच्या एका सिनेमाचं शूटिंग करुन येत होता. गिरीजा तेव्हांही दिसायला अतिशय सुंदर होती. त्यामुळे इमरान हाश्मी तिच्याकडे सतत एकटक पाहत होता… , असे त्यांनी सांगितले.
गिरीजा तेव्हा एक कॉलेज स्टुडंट होती. तिचे सरळ लांबसडक केस, तजेलदार त्वचा, दिसायला प्रचंड सुंदर… आजही ती तितकीच सुंदर आहे. नॅशनल क्रश ती होणारच होती… त्यामुळेच तर इम्रान तिला पाहत होता. इमरान हाश्मीची क्रश ती नॅशनल क्रश होणारच ना! हे सगळ माझ्या असिस्टंटनं येऊन मला सांगितले होतं… असे कांचन धर्माधिकारी त्यावेळी म्हणाल्या.
गिरीजाला आज मी नॅशनल क्रश म्हणून व्हायरल झालेलं पाहिलं. पण त्यावेळी तिच्यावर केलेल्या कमेंट्स पाहून मला वाईट वाटलं. एका रात्रीत खरंतर कोण मोठा होत नाही. अरे तुम्ही तिनं आधी काय स्ट्रगल केलाय ते बघा… तिने कधीच चुकीचं काही केलेलं नाही. किंवा अंगप्रदर्शन करुन तिनं कधीच प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. तुम्ही तिचं कौतुक केलं पाहिजे. आपली मराठी मुलगी आज इथवर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे कौतुक झालंच पाहिजं. पण मराठी माणूसच आधी पाय खेचण्यास पुढे असतो, अशी खंत दिग्दर्शिका, निर्मात्या कांचन अधिकारी यांनी व्यक्त केली.




























































