
महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये कलालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. चंद्रपूर भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासमगुट्टवार यांनी प्रदेशाध्यक्षाने फायनल केलेली उमेदवाराची यादीच बदलून टाकत 10 हून अधिक उमेदवार बदलले. याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती पडताच त्यांनी सुभाष कासमगुट्टवार यांच्यावर कारवाई करत त्यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आले आहे.
प्रदेश कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी यासंबंधी एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी म्हटले की, सुभाष कासमगुट्टवार यांना 31 डिसेंबर 2025 पासून भाजप चंद्रपूर महानगर अध्यक्षपदावरून तत्काळ पदमुक्त करण्यात येत आहे. वर्षभरापूर्वीच कासमगुट्टवार यांची या पदावर नियुक्ती झाली होती. त्या नियुक्तीला मोठा विरोधही झाला होता. परंतु, ऐन महापालिका निवडणुकीत त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.




























































