भाजपची कार्यकर्ती म्हणतेय, मी कुठे चुकले?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक 2 मधून आयत्या वेळी पक्षात आलेल्या तेजस्वी घोसाळकरांना भाजपने उमेदवारी दिल्याने या उमेदवारीला भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेली ही महिला थेट व्यासपीठावरून म्हणाली की, पक्षाचा निर्णय मला मान्य आहे. पण कार्यकर्त्यांचे काय? मी पक्षासाठी काम केले आहे. मी कुठे चुकले? हे मला पक्षाने सांगावे, असे म्हटले. मी कुणालाही शिवीगाळ किंवा दादागिरी करत नाही. केवळ मनातील भावना व्यक्त करत आहे. त्यामुळे मला बोलू द्या. मी मागील 10 वर्षांपासून दहिसर विधानसभा मतदारसंघात भाजपची कार्यकर्ती म्हणून काम कर आहे. आमदार मनीषा चौधरी यांनी ज्या जबाबदाऱ्या दिल्या, त्या संधी मानून पार पाडल्या. माझ्यासह माझ्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट घेतले. असे असूनही पक्षाने मला उमेदवारी नाकारली. जीव तोडून काम केल्यामुळे मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे, असेही या कार्यकर्तीने यावेळी ठणकावून सांगितले.