
महापालिका निकडणुकांच्या रणधुमाळीत भाजपने पुण्यात मोठा राजकीय भूकंप घडवला आहे. भाजपने तब्बल 42 माजी नगरसेवकांना तिकीट नाकारून घरी बसवले आहे. प्रभावी नगरसेवक, ज्येष्ठ नेते, आमदार-खासदारांचे नातेकाईक यांची तिकिटे कापली आहेत. मात्र, त्यांच्या घरात नातेवाईकांना तिकीटे दिली असून घराणेशाहीची परंपरा सुरू केली आहे.
भाजप–शिंदे गटाची युती जागावाटपाच्या वादात तुटल्यानंतर भाजपने 158 जागांवर उमेदवार जाहीर केले, तर 7 जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) साठी सोडल्या. तिकीट वाटप करताना अखेरच्या क्षणापर्यंत उमेदवार बदलाचा खेळ सुरू होता. दुपारी एक वाजेपर्यंत सुरू असलेल्या या गोंधळात अनेक दिग्गजांची तिकिटे कापली गेली. 165 पैकी 90 जागांकर महिलांना, तर 75 जागांकर पुरुष उमेदवारांना संधी देत भाजपने महिला कार्ड कापरले आहे. मात्र 42 माजी नगरसेवकांचे तिकीट कापल्याने पक्षात प्रचंड असंतोष उफाळून आला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी बंडखोरी करत थेट दुसऱ्या पक्षांतून अर्ज दाखल केले. यामध्ये केकळ सामान्य नगरसेवक नक्हे, तर प्रभावी आमदार आणि वरिष्ठ नेत्यांचे पुत्र-नातेवाईक यांनाही भाजपने मोकळे केले.

























































