
दूध प्रक्रिया उद्योग, तृणधान्य उत्पादन मिलेट-आधारित खाद्य, हुरडा पार्टी, पारंपरिक नैसर्गिक शेती पद्धती, ज्वारी पट्टय़ाची वैशिष्टय़े, ग्रामीण पाककृती, स्थानिक उत्पादन विक्री केंद्र या सर्वांच्या माध्यमातून भालेवाडी गाव राज्यातील आदर्श पर्यटन गाव म्हणून उदयास येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कृषी ग्रामीण पर्यटनाला नवसंजीवनी देण्याच्या दिशेने सोलापूर जिल्हा प्रशासनाने विकासाच्या दिशेने ठोस पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक पर्यटन विकास प्रकल्पात कृषी पर्यटन, कृषी मॉल, रेशीम शेती, धार्मिक पर्यटन, जल पर्यटन आणि हे प्रमुख घटक समाकिष्ट आहेत. याच प्रकल्पाचा एक भाग म्हणून मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथे राज्यातील पहिली ‘कृषी ग्रामीण पर्यटन शेतकरी समिती’ अंतर्गत अधिकृतरीत्या नोंदणी करण्यात आली.
या दूध आणि तृणधान्य उत्पादनाचा आधार घेत ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, शेतकऱ्यांसाठी पूरक उत्पन्नाची निर्मिती करणे, पर्यटनाच्या नक्या संधी उपलब्ध करणे हा समिती स्थापनेमागील प्रमुख हेतू आहे. उपक्रमात स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ, महिला बचत गट आणि युवकांचा उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पुढील काळात कृषी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांची उभारणी, प्रशिक्षित गाईड, स्वच्छता सुरक्षा व्यवस्था, डिजिटल प्रचार–प्रसार ब्रँडिंग या उपक्रमामुळे भालेवाडी गाव सोलापूर जिह्याच्या ग्रामीण पर्यटन नकाशावर एक महत्त्काचे केंद्र बनेल, असा किश्कास प्रशासनाने केला आहे.
सोलापूर जिह्यासाठी दिशादर्शक
‘भालेवाडी ग्रामस्थांनी ग्रामीण पर्यटन विकासाच्या क्षेत्रात एक नकी ओळख निर्माण केली आहे. हा उपक्रम सोलापूर जिह्यासाठी दिशादर्शक ठरेल. यामुळे केकळ स्थानिक रोजगाराच्या संधीच काढणार नाहीत, तर गावाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. लककरच भालेवाडी हे एक ‘आदर्श पर्यटन गाव’ म्हणून नावारूपास येईल.’



























































