
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 87 मधून निवडणूक लढविणारे भाजप उमेदवार अनधिकृत बांधकामामुळे अडचणीत आले आहेत. अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी पारकर यांच्या निवडणूक अर्जावर आक्षेप घेत दाखल केलेल्या याचिकेमुळे हा वाद हायकोर्टात पोहोचला आहे. भाजप उमेदवार कृष्णा पारकर यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा यासाठी अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.
भाजप उमेदवार पारकर यांच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीवेळी महेंद्र पवार यांनी पारकर यांनी अनधिकृत बांधकाम केले असून त्यांनी अर्जात खोटी माहिती दिली असल्याचा आक्षेप घेतला होता. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत तसेच अनधिकृत बांधकामाचे पह्टो 251 ची नोटीस निवडणूक निर्णय अधिकाऱयांना दिली होती, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी आक्षेप फेटाळून लावत पारकर यांचा अर्ज वैध ठरवला. याविरोधात पवार यांनी उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.





























































