पहिल्याच दिवशी झटका, व्यावसायिक गॅस सिलिंडर 111 रुपयांनी महागला

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी हॉटेल व रेस्टॉरंट चालकांना झटका बसला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 111 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर महाग झाला आहे. मुंबईत हा सिलिंडर यापुढे 1642.50 रुपयांना मिळणार आहे. दिल्ली, चेन्नई, कोलकात्यामध्येही या सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत.