व्रेमरसह झिम्बाब्वेचा टी-20 संघ जाहीर

सात वर्षांच्या खंडानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतलेला माजी कर्णधार ग्रेम व्रेमर झिम्बाब्वेच्या 2026 टी-20 विश्वचषकासाठी जाहीर झालेल्या 15 सदस्यीय संघात सामील झाला आहे. पाकिस्तानमधील त्रिकोणी मालिकेत पुनरागमन करत त्याने दोन सामन्यांत उपयुक्त गोलंदाजी केली. दुखापतीतून सावरलेला ब्लेसिंग मुजरबानीही संघात परतला आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणारा क्लाइव्ह मदांडेनेही स्थान कायम राखले आहे. अनुभवी सिपंदर रझा संघाचे नेतृत्व करणार असून ब्रेंडन टेलर आणि रिचर्ड नगरावा यांचा अनुभव संघाला बळ देईल. गट ‘बी’ मध्ये झिम्बाब्वेचा सामना ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, आयर्लंड आणि ओमानशी होणार आहे.

झिम्बाब्वे संघ (टी-20 विश्वचषक 2026) सिकंदर रझा (कर्णधार), ब्रायन बेनेट, रायन बर्ल, ग्रेम व्रेमर, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मदांडे, टिनोटेंडा मापोसा, तडिवानाशे मरुमानी, वेलिंग्टन मसाकाद्झा, टोनी मुनयोंगा, ताशिंगा मुसेकिवा, ब्लेसिंग मुजारबानी, डिऑन मायर्स, रिचर्ड नगरावा, ब्रेंडन टेलर.