
>> आशिष निनगुरकर
नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात, नवी वाट आणि नव्या आशांची किल्ली. संकल्प फक्त बोलण्यापुरते न ठेवता ते कृतीत आणा. छोट्या बदलांनी मोठा परिणाम घडतो. येणारे 2026 वर्ष तुम्हाला आरोग्य, आनंद, समृद्धी आणि यशाचे जावो. तुमचे नवीन संकल्प पूर्णत्वास जावोत याच या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
डिसेंबर महिना जसा संपू लागतो तसे जानेवारी म्हणजेच नव्या वर्षाचे वेध लागतात, थंडगार वारा वाहू लागतो, वर्षाच्या नवीन दिवसांची चाहूल लागू लागते आणि मनाची नकळत खिडकी उघडते.जुने आठवणींचे आणि नवीन अपेक्षांची ऊब एकाच वेळी अनुभवायला मिळते. जुने वर्ष म्हणजे जणू एखादा अनुभवांनी भरलेला जाडजूड अध्याय. काही पाने समाधानाची, काही कर्तृत्वाची तर काही पश्चात्तापाची, पण 31 डिसेंबरची मध्यरात्रीची घंटा वाजते आणि आपण नव्या वर्षाच्या पायऱ्यांवर उभे राहतो. हे फक्त कॅलेंडरचे बदललेले पान नसते तर नव्या ऊर्जेचा, नव्या विचारांचा आणि नव्या संकल्पांचा आरंभ असतो.
नवीन वर्षाचे आगमन होताच आपण स्वतसाठी काही नवे वचन करतो, संकल्प करतो. संकल्प म्हणजे स्वतला दिलेली छोटी, पण परिणामकारक प्रतिज्ञा. हे वचन केवळ कागदावर किंवा मनात राहू नये, तर आयुष्याच्या व्यवहारात उतरावे हेच खरे महत्त्वाचे. म्हणूनच नव्या वर्षात शरीर, मन, नाती, करीअर आणि जीवनशैली या प्रत्येक अंगाने सुधारणा करण्याचा निर्णय घेणे आवश्यक आहे.
आरोग्याला प्रथम स्थान देणे गरजेचे आहे. कारण शरीर फिट असेल तर मनही प्रसन्न राहते. दररोज सकाळी 30 मिनिटे चालणे, योगाभ्यास करणे किंवा धावण्याची सवय लावणे इतकं साधं पाऊल देखील तुमचा दिवस अधिक ऊर्जावान करू शकतं. तळकट पदार्थ कमी सेवन करणे, वेळेवर झोपणे, पाण्याचे प्रमाण वापौष्टिक आहार घेणे या छोटय़ा गोष्टी एकत्रितपणे मोठा बदल घडवतात. आपलं जीवनमान अधिक परिमाणकारक बनवतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपला बहुतेक वेळ क्रीनसमोर जातो. सकाळ उठल्यावर पहिले मोबाईल आणि झोपण्यापूर्वी शेवटचेही तेच. हे वास्तव बदलण्याची गरज आहे.
डिजिटल डिटॉक्सची सवय वर्षाच्या सुरुवातीपासून लावता आली तर मानसिक शांतता मिळते. दिवसातून किमान काही तास फोनपासून दूर राहणे, सोशल मीडिया वापर नियंत्रित ठेवणे, रविवार किंवा आठवड्यातील एक दिवस ‘नो क्रीन डे’ पाळणे इतके छोटे प्रयत्न मन मोकळे करतात. त्याच वेळी छंद जोपासा. चित्रकला, संगीत, बागकाम, लेखन किंवा भटकंती याला वेळ द्या. आपण स्वतला वेळ देतो तेव्हा मनातील सर्जनशीलता फुलते. वाचन हा आणखी एक सुंदर संकल्प. पुस्तकांचे जग निराळेच असते. ते विचारांना आकार देते, ज्ञान वाआणि भावविश्व समृद्ध करते. एका वर्षात दहा-बारा पुस्तके वाचण्याचे ध्येय ठेवले तर सतत सकारात्मक ऊर्जा मिळत राहते. पुस्तक हे कधीही साथ न सोडणारे मित्र असतात.
जीवनात सकारात्मक दृष्टी ठेवणे महत्त्वाचे असते. प्रत्येक परिस्थितीतील चांगले शोधण्याची सवय लावली की, अडचणीदेखील संधी वाटू लागतात. तक्रारींपेक्षा कृतज्ञता, निराशेपेक्षा आशावाद आणि रागाऐवजी संयम मनाला स्थैर्य देतात. हे प्रत्येक सकाळी स्वतला आठवा. हळूहळू मानसिक आरोग्य मजबूत होते आणि व्यक्तिमत्त्व उजळून निघते. तात्पुरत्या इच्छा आणि भावनेतून खर्च करणे हे आजच्या पिचे मोठे आव्हान आहे. म्हणून वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक नियोजन करणे अत्यावश्यक आहे. मासिक खर्च, बचत, गुंतवणूक यांचे बजेट तयार करा. अनावश्यक खरेदी कमी करा आणि थोडी थोडी बचत करा. वर्षाअखेरीस जमा होणारी रक्कम तुम्हाला स्वतचे कौतुक वाटायला लावेल आणि ते बघून अभिमानाने छाती फुलून येईल.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यांसोबत कुटुंबाला वेळ देणे विसरू नका. क्रीन नाही, फक्त संवाद हवा. एकत्र चहा, एकत्र जेवण, एक छोटा प्रवास, जुन्या आठवणी… अशा क्षणांत नाती अधिक घट्ट होतात. घरातील हास्य हे सर्वोत्तम थेरपी आहे. तसेच वैयक्तिक व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ग्रुमिंग, भाषा शैली, नवीन कोर्स, फिटनेस टार्गेट किंवा एखादी नवी कला शिकण्याचा संकल्प करा. स्वतवर केलेली गुंतवणूक सर्वात मौल्यवान असते.
शेवटी, नवीन वर्ष म्हणजे नवी सुरुवात, नवी वाट आणि नव्या आशांची किल्ली. संकल्प फक्त बोलण्यापुरते न ठेवता ते कृतीत आणा. छोटय़ा बदलांनी मोठा परिणाम घडतो. येणारे 2026 वर्ष तुम्हाला आरोग्य, आनंद, समृद्धी आणि यशाचे जावो. तुमचे नवीन संकल्प पूर्णत्वास जावोत याच या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


























































