हिवाळ्याच्या सीझनमध्ये लालचुटूक स्ट्राॅबेरी का खायला हवी, जाणून घ्या

सीझन कुठलाही असो, हंगामी फळे खाणे हे आपल्या जिभेसाठी उत्तम असते. परंतु आपल्या आरोग्यासाठी सर्वात अधिक उत्तम असते. कोणतेही हंगामी फळ हे आपल्या आरोग्यासाठी वरदान मानले जाते. स्ट्रॉबेरी ही केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर फळ आहे. नियमित आणि योग्य प्रमाणात स्ट्रॉबेरी खाल्ल्याने शरीराला अनेक लाभ होतात.

रोज रताळे का खायला हवे, जाणून घ्या त्याचे आरोग्यवर्धक फायदे

स्ट्रॉबेरी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

वजन कमी करण्यास मदत – स्ट्रॉबेरीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असते. त्यामुळे पोट भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात राहते.

पचनक्रिया सुधारते– फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनसंस्था निरोगी राहते.

दररोज केळी खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

रक्तातील साखर नियंत्रणात राहते– स्ट्रॉबेरीचा Glycemic Index कमी असल्यामुळे मधुमेहींसाठी मर्यादित प्रमाणात सेवन सुरक्षित मानले जाते.

कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत – स्ट्रॉबेरीतील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री-रॅडिकल्स नष्ट करून कर्करोगाचा धोका कमी करतात.

मेंदूचे आरोग्य सुधारते– स्मरणशक्ती वाढवण्यास आणि मेंदूच्या पेशींचे संरक्षण करण्यास स्ट्रॉबेरी उपयुक्त ठरते.

काॅफीमध्ये तूप घालण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

रोगप्रतिकारक शक्ती वाढते – स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात Vitamin C असते. त्यामुळे सर्दी-खोकला, संसर्ग यापासून संरक्षण मिळते.

हृदय आरोग्य चांगले राहते– यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

त्वचा उजळ व निरोगी राहते- स्ट्रॉबेरी त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे त्वचा चमकदार राहते, सुरकुत्या कमी होतात आणि वृद्धत्वाची लक्षणे उशिरा दिसतात.

जेवल्यानंतर एक वाटी ताक पिण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा

कसे खावे?

ताजी स्ट्रॉबेरी धुवून खावी.

सलाड, स्मूदी किंवा दह्यात घालून खाता येते.