
भाजपचे माजी खासदार बृजभूषण शरण सिंह तोंडावर पडले आहेत. एका कार्यक्रमात ही घटना घडली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गोंडा जिल्ह्यातील नंदनी नगर येथे आयोजित राष्ट्र कथा महोत्सवात ते सहभागी झाले होते. तिथे कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चढताना ते अडखळले आणि काही कळण्याच्या आत तोंडावर पडले. सुरक्षा रक्षकांनी त्यांना सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत त्यांनी कोलांटउडी खाल्ली होती.
बृजभूषण सिंह हे भाजपचे बाहुबली नेते आहेत. काही वर्षांपूर्वी महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यामुळे ते वादात अडकले होते, मात्र दिल्ली न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले.




























































