मुंबईतून चोरी झालेले दोन कोटींचे मोबाईल उत्तर प्रदेशातून हस्तगत, पोलिसांनी मूळ मालकांना केले परत

 

एका विशेष मोहिमेअंतर्गत मुंबईत हरवलेले किंवा चोरीला गेलेले सुमारे 2 कोटी रुपयांचे किमतीचे 1650 मोबाईल फोन उत्तरप्रदेश राज्यातील विविध भागांतून हस्तगत करण्यात आले आहेत. तांत्रिक तपास आणि समन्वयाच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली असून, चोरी व हरवलेल्या मोबाईलचा माग काढून ते जप्त करण्यात यश आले आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 33514 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालणे तसेच नागरिकांचा हरवलेला मोबाईल परत मिळवून देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असून पुढील काळातही ही कारवाई अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याचे संबंधित यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.