
चंद्रपूरचे भाजप उमेदवार संजय कंचर्लावार यांना प्रचारादरम्यान मतदारांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे उमेदवारांला तिथून काढता पाय घ्यावा लागला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे.
भानापेठ प्रभागातून संजय कंचर्लावार भाजप उमेदवार आहेत. बगड खिडकी परिसरात ते पोचताच स्थानिक युवकांनी त्यांना घेराव घातला. 2017 पासून 2022 पर्यंत ते इथे नगरसेवक आहेत. मात्र, तरीही या भागातील समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे ते प्रचारासाठी इथे येताच स्थानिक युवकांनी त्यांना अडवले आणि जाब विचारला. युवकांचे उग्र रूप बघून संजय कंचर्लावार निरुत्तर झाले. प्रचार करायला येता आणि निवडून गेल्यावर गायब होता, अशा शब्दांत स्थानिकांनी रोष व्यक्त केला. स्थानिकांचा रोष बघून शेवटी संजय कंचर्लावार आणि इतर उमेदवारांना तिथून काढता पाय घ्यावा लागला. यापूर्वी भाजपच्या एका महिला उमेदवाराला असेच परतवून लावण्यात आले होते.
चंद्रपूरचे भाजप उमेदवार संजय कंचर्लावार यांना प्रचारादरम्यान मतदारांनी घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. यामुळे उमेदवारांला तिथून काढता पाय घ्यावा लागला. या सर्व प्रसंगाचा व्हिडिओ समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. pic.twitter.com/8VmfgLjDu7
— Saamana Online (@SaamanaOnline) January 11, 2026































































