
अंधेरीच्या लोखंडवाला येथील एका इमारतीमध्ये गोळीबार झाल्याची घटना आज रात्री घडली. गोळी इमारतीमधील दुसऱया चौथ्या मजल्यावरील एका घरातील भिंतीमध्ये शिरली. याची माहिती समजताच स्थानिक आणि गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी आले होते. गोळीबाराचे नेमके कारण समजू शकले नाही.
ओशिवरा येथे एक इमारत आहे. आज रात्री इमारतीच्या दुसऱया आणि चौथ्या मजल्यावरील घरात गोळीबार झाला. गोळीबाराची घटना वाऱयासारखी पसरली. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. गोळी भिंत आणि वूडन केसवर लागली. नेमका गोळीबार कोणत्या वादातून झाला हे स्पष्ट झाले नाही.































































