
इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांसोबत काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संवाद साधला. पाण्यात विष, हवेत विष, औषधात विष, जमिनीत विष आणि उत्तर मागितल्यास बुलडोझर. भाजपच्या डबल इंजिन सरकारचे हे नवे स्मार्ट सिटी मॉडेल असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. अशा प्रकारच्या मॉडेलमध्ये गरीबांच्या मृत्यूंसाठी कोणीच जबाबदार नसते, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.
यावेळी पीडित कुटुंबीयांनी प्रशासनावर आरोप केला की, मृतांचा आकडा लपवण्यात आला आहे. स्मशानातून मृतांचे रेकॉर्डदेखील गायब करण्यात आले आहेत.

























































