
दोन वर्षांपूर्वी कुकी आणि मैतेई या समुदायांमधील संघर्षात मणिपूर पेटले होते. त्यावेळी अनेक जणांची हत्या करण्यात आली, तसेच महिलांवरही अत्याचार करण्यात आले होते. त्यावेळी मणिपूरची राजधानी इंफाळमधून एका कुकी समुदायातील तरुणीचे अपहरण करुन तिच्यावर अतिशय निर्दयीपणे सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. प्रचंड मानसिक त्रास अणि शारीरिक वेदनांपुढे अखेर तिची झुंज संपली. या तरुणीचा मृत्यू झाला.
मणिपूरमध्ये 3 मे 2023 पासून दोन समुदायांमध्ये संघर्ष पेटला होता. त्यावेळी 18 वर्षे वय असलेल्या तरुणीचे 15 मे रोजी अपहरण करण्यात आले होते. तिने 21 जुलै रोजी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये म्हटले होते की, काळ्या रंगाचा टी शर्ट घालून आलेल्या 4 सशस्त्र पुरुषांनी तिला पांढऱया रंगाच्या बोलेरो गाडीतून अपहरण करुन नेले. चालक वगळता तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित तरुणी त्यावेळी गंभीर जखमी झाली होती. तिच्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली होती. शौचालयाला जाण्याच्या बहाण्याने पट्टी काढल्यानंतर तिने तेथून पळ काढला. या घटनेने तिच्यावर मोठा मानसिक आघात झाला होता. त्यातून ती सावरली नाही. मणिपूरमध्ये एन. बीरेन सिंह यांनी 9 फेब्रुवारी 2025 रोजी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून तेथे राष्ट्रपती शासन आहे.
मृत्यूचे कारण काय?
पीडित मुलीवर गुवाहाटी येथे उपचार करण्यात आले होते. ती चमत्कारिकरीत्या वाचली होती. मात्र, तिला गंभीर जखमा झाल्या होत्या. तसेच गर्भाशयाच्या गंभीर गुंतागुतीचे आजारही तिला झाले होते. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. अखेर तिने 10 जानेवारी रोजी मणिपूरच्या सिंगहाट येथे अखेरचा श्वास घेतला.
प्रकरण सीबीआयकडे, कारवाई शून्य
हे प्रकरण 22 जुलै रोजी सीबीआयकडे सोपविण्यात आले होते. मात्र, त्याबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. कुकी समुदायातील लोकांनी 17 जानेवारी रोजी चुराचांदपूर येथे पँडल मार्च काढला होता.
या बातमीसाठी इंग्रजी छोट्या लिपीमध्ये Url आणि SEO लिहून द्या.

























































