शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीनिमित्त उपक्रम, शिवसेनेतर्फे ताडदेवमध्ये भव्य रक्तदान शिबीर

Shiv Sena Organizes Mega Blood Donation Camp in Tardeo for Balasaheb Thackeray's Birth Centenary

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रविवारी ताडदेव येथे जय भवानी प्रतिष्ठान, शिवसेना शाखा क्र 215 आणि युवासेना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी मोठय़ा प्रमाणावर प्रतिसाद दिला. दिवसभरात 203 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

ताडदेव येथील अरविंद कुंज पदपथ, पेट्रोल पंप परिसरात हे भव्य रक्तदान शिबीर घेण्यात आले. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, आशीष चेंबूरकर, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, दक्षिण मुंबई समन्वयक माई परब, मलबार हिल विधानसभा संघटक अरविंद बने, नगरसेवक विजय भणगे, नगरसेविका संपदा मयेकर, उपविभागप्रमुख सुजित राणे, सुरेंद्र निगुडकर, शाखाप्रमुख वैभव मयेकर, प्रभाकर पाष्टे, राजेंद्र गायकवाड, समन्वयक किरण बाळसराफ, गजानन भोसले, यशोदा कोटियन आदी मान्यवरांनी रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट दिली. शिवसेना उपनेते, रत्नागिरी-सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका अरुंधती दुधवडकर, शाखाप्रमुख विजय पवार, युवासेना उपसचिव, हेमंत दुधवडकर, शाखा संघटिका सुप्रिया शेडेकर यांनी शिबीर आयोजनामध्ये पुढाकार घेतला होता.