भाजप खासदाराच्या घरी चोरी, माजी कर्मचारी पोलिसांच्या ताब्यात

भाजप खासदार मनोज तिवारी यांच्या घरी माजी कर्मचाऱ्याने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. चौकशीसाठी पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. तक्रारदार हे खासदार मनोज तिवारी यांचे व्यवस्थापक आहेत. त्यांनी घरातील बेडरूममध्ये 5.40 लाख रुपये ठेवले होते. त्यातील काही पैसे कपाटातून गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

घरातून पैसे गेल्याने त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले. गेल्या आठवड्यात माजी कर्मचारी घरात शिरला. घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात माजी कर्मचारी चोरी करताना दिसला. त्या कर्मचाऱ्याकडे घराच्या बनावट चाव्या होत्या. चोरीचा प्रकार लक्षात येताच त्या कर्मचाऱ्याला बोलवले. त्याने चोरी केल्याची कबुली दिली याची माहिती अंबोली पोलिसांना देण्यात आली. अंबोली पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. व्यवस्थापकाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. घटनास्थळाचे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या माजी कर्मचाऱ्याला दोन वर्षांपूर्वी कामावरून काढून टाकले होते.