पाकिस्तानात हिंदू मुलींचे सक्तीचे धर्मांतर

पाकिस्तानातील हिंदू मुलींच्या सक्तीच्या धर्मांतराला विरोध करणाऱ्या कच्छींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इस्लामी गट ‘तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’कडून कच्छींना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत, अशी ‘एक्स’ पोस्ट सिंध प्रांतातील अल्पसंख्याक हक्क कार्यकर्ते आणि ‘दारावर इत्तेहाद’ या संघटनेचे संस्थापक शिवा कच्छी यांनी केली आहे. याप्रकरणी पाकिस्तान सरकारचे दुर्लक्ष होत असून आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मदत मागितली आहे. कच्छी यांनी म्हटले आहे की, अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण आणि सक्तीचे धर्मांतर रोखण्यासाठी मी काम करत असल्याने मला इस्लामविरोधी आणि देशद्रोही ठरवण्यात येत आहे. माझ्या हत्येसाठी फतवे काढले जात आहेत. माझ्या कुटुंबाला किंवा मला काही झाले तर त्याला पूर्णपणे पाकिस्तान सरकार जबाबदार असेल.