मध्य प्रदेशात भरधाव कारने 13 मजुरांना चिरडले

मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रविवारी भरधाव येणाऱ्या कारने 13 मजुरांना चिरडले. या अपघातात 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 मजूर जखमी झाले. चैनवती बाई (40 वर्षे) आणि लच्छो बाई (40 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. जखमींपैकी 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात बरेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकता चौकात घडला. मजूर रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या लोखंडी जाळ्या साफ केल्यानंतर बसून जेवण करत होते. त्याचवेळी जबलपूरच्या दिशेने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना चिरडून पळ काढला.