उत्तरेकडे थंडी आणि धुक्याचा कहर

उत्तर हिंदुस्थानातील अनेक भागांत तीव्र थंडी आणि धुक्याचा कहर दिसून येत आहे. सकाळी दिल्ली, एनसीआर आणि त्याच्या आसपासच्या भागात धुक्याची चादर पसरली. शनिवारी धुक्यामुळे समोरचे काहीही दिसत नसताना वाहनांचा वेग मंदावला. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेता हवामान खात्याने ही थंडीची लाट आणि दाट धुके पुढील काही दिवस कायम राहील असा इशारा दिला. येत्या काळात तापमानात आणखी घट होणार आहे.