इराणमध्ये जहाज जप्त; 16 हिंदुस्थानींना घेतले ताब्यात, महिनाभरापासून मदतीच्या प्रतीक्षेत

इराणने हिंदुस्थानी क्रू मेंबर्सचे एक जहाज 8 डिसेंबर 2025 रोजी ताब्यात घेतले होते. या जहाजावर 16 हिंदुस्थानी क्रू सदस्य होते. हे क्रू सदस्य इराणच्या ताब्यात आहेत. 8 डिसेंबरनंतर त्यांच्याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

इराणमधून 6 हजार टन डिझेलची तस्करी केल्याचा आरोप करत इराणने जहाज जप्त केले आहे. तेहरानमधील हिंदुस्थानी दूतावासाने या क्रू सदस्यांना ‘कॉन्सूलर अ‍ॅक्सेस’ देण्याची मागणी इराणकडे केली आहे. ‘कॉन्सुलर अॅक्सेस’ मिळाल्यास परदेशातील तुरुंगात अडकलेल्या नागरिकांना भेटून त्यांची चौकशी करण्याचा अधिकार हिंदुस्थानी अधिकाऱ्यांना मिळतो.

  • दूतावासाने इराणी अधिकाऱ्यांना विनंती केली की, हिंदुस्थानी क्रू सदस्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्प साधण्याची परवानगी द्यावी. संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणाऱ्या जहाजाच्या मालकाशीही 15 डिसेंबर रोजी संपर्क साधण्यात आला.
  • जहाजाला आवश्यक अन्न, पाणी आणि इंधन मिळेल याची खात्री करण्यासाठी दूतावासाने इराणमधील कंपनीच्या एजंटशी बोलणी केली आहे. शिवाय इराणी न्यायालयात हिंदुस्थानी क्रू सदस्यांसाठी कायदेशीर मदतीची व्यवस्था केली जात आहे.
  • जहाजातील अन्न आणि पाण्याचा साठा कमी पडत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीला इराणी नौदलासोबत अन्न आणि पाण्याचा आपत्कालीन पुरवठा करण्यासाठी संपर्क साधल्याचे दूतावासाने सांगितले.