
दिल्ली गुन्हे शाखेने लॉरेन्स बिश्णोई गँगच्या एका शूटरला अटक केली आहे. प्रदीप शर्मा (23) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो आग्रा येथील रहिवासी आहे. राजस्थानमधील एका व्यापाऱ्याला चार कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी तो वॉन्टेड होता.
मे 2025 मध्ये राजस्थानमध्ये खंडणीची मागणी करत गोळीबार केल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. तसेच गेल्या वर्षी मार्च महिन्यात या टोळीच्या सदस्यांनी संबंधित व्यापाऱ्याकडे चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचेही उघड झाले आहे.



























































