वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचा यशोत्सव उत्साहात

 ‘वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट’चा द्वितीय वर्धापन दिन नुकताच परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर सेवा संघ येथे मोठय़ा उत्साहात पार पडला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित ‘यशोत्सव 2026’ या कार्यक्रमाला राज्यासह देश-विदेशातून 700हून अधिक उद्योजकांनी उपस्थिती लावली होती.

‘यशोत्सव 2026’मध्ये समाजातील यशस्वी व्यावसायिकांना ‘उद्योग रत्न’ तर ज्येष्ठ व्यावसायिकांना ‘उद्योग श्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच वैश्य समाजातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर, कणकवली; सुनील काणेकर, चंदगड; सौरिमागंधे, वाडा;  रश्मी कोठावळे, मलकापूर यांचा खास सत्कार या वेळी करण्यात आला. या वेळी संस्थापक डॉ. संतोष कामेरकर, उपाध्यक्ष दीपक मेजरी, सचिव रूपाली तेलवणे यांच्यासह ज्येष्ठ उद्योजक भाई कामेरकर, मोटिवेशनल स्पीकर्स संतोष सपकाळ, दीपक शिंदे, प्रदीप लोखंडे, आरती बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.