मनसे गटनेते पदी यशवंत किल्लेदार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेते पदाची जबाबदारी यशवंत किल्लेदार यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या पक्षाच्या बैठकीत अंतिम निर्णय झाला. उद्या कोकण भवन येथे जाऊन गटाची स्थापना करण्यात येणार असल्याचे यशवंत किल्लेदार यांनी आज सांगितले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पक्षाच्या गटनेते पदाबाबत चर्चा करण्यात आली असून यासाठी यशवंत किल्लेदार यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती यशवंत किल्लेदार यांनीच पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भातील सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून मंगळवारी कोकण भवन येथे याबाबतची कार्यवाही पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘बिहार भवन’ मनसे होऊ देणार नाही

मुंबईत उभारण्यात येणाऱया ‘बिहार भवन’ला मनसेचा विरोध राहणार आहे. ते होऊ देणार नाही. इथे महाराष्ट्रातल्या शेतकऱयावर अवकाळीची संक्रांत आली आहे. महाराष्ट्रातला तरुण मोठय़ा प्रमाणात बेरोजगार आहे. मग इथे बिहार भवन कशाला, असा सवाल किल्लेदार यांनी उपस्थित केला आहे.