
कुर्ला येथील सर्वेश्वर संगीत विद्यालयाने ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठावर आधारित ‘सर्व सुख गोडी’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात 21 जानेवारी रोजी रात्री 8 वाजता हा कार्यक्रम होईल. ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात अंकुश दीक्षित, मिलिंद करमरकर, केदार पावनगडकर, भगवान सहजराव, राजेंद्र दातार, जयश्री घैसास आठवले, उमा दीक्षित व वैष्णवी दीक्षित गायन करतील. त्यांना राजन माशेलकर, सचिन धुमाळ, कांचन लेले-गोळे, रमा दीक्षित-लिमये, वेदांत शेलार, श्वेत देवरुखकर साथसंगत करतील. संगीत संयोजन अंकुश दीक्षित यांचे आहे.


























































