चुकीचा स्पर्श केल्याच्या कथित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या महिलेवर गुन्हा; पुरुषाने जीवन संपवल्यानंतर कारवाई

Kerala Man Dies by Suicide Over Social Media Harassment Charge; Case Filed

केरळमध्ये एका ४२ वर्षीय व्यक्तीने सोशल मीडियावरील बदनामीला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने बस प्रवासादरम्यान या व्यक्तीने विनयभंग केल्याचा आरोप करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी आता संबंधित महिलेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मृत व्यक्ती दीपक (४२, रा. गोविंदपुरम) हे एका कपड्याच्या कंपनीत कामाला होते. शुक्रवारी कामाच्या निमित्ताने ते बसने कन्नूरला जात होते. त्याच बसमध्ये प्रवास करणाऱ्या शिम्जिथा मुस्तफा (३५) या महिलेने दीपक यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत एक व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला, जो काही वेळातच मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

व्हिडिओ दीपक यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर, समाजात आपली नाहक बदनामी होत असल्याच्या नैराश्यातून त्यांनी रविवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती, मात्र नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर कोझिकोड मेडिकल कॉलेज पोलिसांनी शिम्जिथा मुस्तफा हिच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मानवाधिकार आयोगाची दखल

केरळ राज्य मानवाधिकार आयोगाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून पोलीस तपासाचे आदेश दिले आहेत. उत्तर परिमंडळाच्या पोलीस उपमहानिरीक्षकांना (DIG) एका आठवड्यात अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ फेब्रुवारीला होणार आहे.

भाजप नेते पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन या प्रकरणात संथ गतीने तपास होत असल्याचा आरोप केला आहे. आरोपी महिला एका राजकीय पक्षाची सक्रिय कार्यकर्ता असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक फायद्यासाठी असे कृत्य करण्याचे प्रमाण वाढत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Kerala Man Dies by Suicide Over Social Media Harassment Charge; Case Filed

A 42-year-old man in Kerala committed suicide after a woman’s viral video accused him of harassment. Police booked Shimjitha Musthafa for abetment to suicide.

Keywords: kerala man suicide case, social media viral video suicide, fake assault charge, abetment to suicide section 108 bns, kozhikode news, deepak suicide kerala, shimjitha musthafa case.