
हिवाळ्यात अनेकांच्या टाचांना भेगा पडतात. त्यामुळे पायात वेदना होतात. अनेकदा भेगांमधून रक्त येते. महागड्या क्रीम किंवा लोशन लावल्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. अशा वेळी काही घरगुती टिप्स उपयोगी ठरू शकतात.
दोन चमचे मोहरीचे तेल, दोन चमचे नारळाचे तेल, कापराच्या 4-5 वड्या, पेट्रोलियम जेली आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल याचे एक मिश्रण तयार करावे.
हे मिश्रण एका काचेच्या बाटलीत साठवून ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी ते मिश्रण पायांवर लावावे. या मिश्रणातील नैसर्गिक घटकांमुळे भेगांमधील जखमा आणि इन्फेक्शन कमी होते. तसेच टाचा लवकर मऊ होतात.




























































