
महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. संघाची तरुण यष्टिरक्षक-फलंदाज जी. कमलिनी दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडली आहे. अवघ्या 17 व्या वर्षीमध्ये संधी मिळवलेल्या कमलिनीचा प्रवास येथेच थांबल्याने संघ व्यवस्थापनासह चाहत्यांनाही निराशा झाली आहे. कमलिनीच्या जागी मुंबई इंडियन्सने 20 वर्षीय डावखुरी फिरकी गोलंदाज वैष्णवी शर्माला संघात घेतले आहे. वैष्णवी ही 2025 मधील घ्ण्ण् अंडर-19 महिला टी-20 विश्चचषक विजेत्या हिंदुस्थान संघाचा भाग होती. तिने आतापर्यंत हिंदुस्थानकडून पाच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दुखापतीमुळे कमलिनीला थांबावे लागले असले तरी ती लवकरच अधिक ताकदीने परत येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.





























































