काखेतील काळेपणा कोणत्या कारणांमुळे वाढतो, जाणून घ्या

अंडरआर्म्समधील पिग्मेंटेशन ही एक सामान्य त्वचेची समस्या आहे. या समस्येमुळे अनेक महिला स्लीव्हलेस ड्रेस घालू शकत नाहीत. अंडरआर्म्समधील पिग्मेंटेशनची अनेक कारणे असू शकतात. बरेचजण काखेतला काळेपणा कमी करण्यासाठी रेझर वापरतात. परंतु सतत रेझर वापरल्याने, त्वचा काळवंडते. अनेक महिला या सलूनमध्ये जाण्याचा त्रास टाळण्यासाठी, महिला घरी हेअर रिमूव्हल क्रीम वापरून केस काढतात. क्रीम्स केस सहजपणे काढून टाकतात, परंतु ते हळूहळू त्वचा काळी पडते.

हिवाळ्यात चेहऱ्यासाठी कोणते मास्क गरजेचे आहेत, जाणून घ्या

ट्रेंडशी जुळवून घेण्यासाठी खूप टाइट कपडे घातले तर काळजी घ्यावी लागते. तज्ज्ञांच्या मते, खूप टाइट कपडे घालल्याने देखील काखेतील काळेपणा वाढतो. काख योग्यरित्या स्वच्छ न केल्याने काळेपणा वाढतो.

घराबाहेर पडण्यापूर्वी परफ्यूम किंवा डिओडरंट लावल्याने काखेतील त्वचा काळी पडण्याचा धोका असतो. डिओडरंट आपल्या त्वचेवर डायरेक्ट स्प्रे केल्याने, त्वचा हळूहळू काळी पडू लागते. डिओडरंटमधील रसायनांमुळे त्वचा काळवंडते.

त्वचेवर ग्लो यावा म्हणून आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, वाचा

वॅक्सिंग हा काखेतील केस काढण्याचा सर्वात उत्तम पर्याय आहे. परंतु खूप गरम वॅक्समुळे देखील त्वचा काळी पडू शकते.

लठ्ठपणामुळे काखेतील आणि गुडघ्यांच्या मागची आणि बाजूची त्वचा काळवंडते. तसेच त्वचेचा वरचा थर देखील जाडसर होतो.

काळ्या काखेसाठी घरगुती उपाय

लिंबाचा रस: लिंबू हे एक नैसर्गिक ब्लीच आहे. आंघोळीपूर्वी दररोज प्रभावित भागात लिंबू चोळल्याने त्वचा हळूहळू उजळ होते. अधिक प्रभावी उपायासाठी, तुमच्या आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा रस पिळून घ्या आणि नंतर ते पाणी आंघोळीसाठी वापरा.

दही लिंबू मास्क: काखेतला काळेपणा दूर करण्यासाठी हा नैसर्गिक उपाय आहे. दही, लिंबू आणि हळद मिसळून पेस्ट बनवावी. त्यानंतर किमान हे मिश्रण १५-२० मिनिटे तसेच राहू देऊन नंतर धुवावे.

कारल्याची भाजी का खायला हवी, जाणून घ्या

बटाट्याचा रस: बटाट्याचे पातळ काप कापून ते काखेतील काळ्या भागावर घासल्याने काळेपणा कमी होण्यास मदत होते. बटाट्याचा रस लावणे देखील फायदेशीर आहे. हे करण्यासाठी, एक बटाटा बारीक करा आणि त्याचा रस काढा. ते प्रभावित भागावर लावा आणि १५ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर ते धुवा. हे नियमितपणे केल्याने फायदा होईल.

केसर आणि दूध: दोन चमचे दुधात एक चिमूटभर केशर मिसळा आणि हे मिश्रण तुमच्या अंडरआर्म्सवर लावा. ते रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवा. यामुळे तुमच्या अंडरआर्म्सचा रंग उजळतोच, शिवाय दुर्गंधीही दूर होते.

लिंबाची साल आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, जाणून घ्या

चंदन आणि गुलाबपाणी: चंदन पावडर आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा आणि प्रभावित भागावर लावा. २० मिनिटांनी धुवा.