
देशी तूप हे केवळ आरोग्यासाठी फायदेशीर नाही, तर त्याचे अनेक सौंदर्य फायदे देखील आहेत. तूप हे आपल्या आरोग्यासाठी जितके फायदेशीर आहे तितकेच ते आपल्या चेहऱ्यासाठी देखील फायदेशीर आहे.
तूप हे त्वचेला मॉइश्चरायझ करते. त्वचा कोरडी आणि निर्जीव असेल तर देसी तूपाने मालिश करणे हे उत्तम समजले जाते. देशी तुपाने त्वचेला मालिश केल्याने, त्वचेवर चमक देखील येते.
लिंबाची साल आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे, जाणून घ्या
तूप हे वृद्धत्वविरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. तुपाने तुमच्या चेहऱ्यावर मालिश केल्याने, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच तुपामध्ये असणारे व्हिटॅमिन ई त्वचेला तरुण आणि चमकदार ठेवते.
ओठ फुटण्याचा त्रास वरचेवर होत असल्यास, ओठांना देशी तूप लावणे हे खूप गरजेचे आहे. देशी तूप बेंबीमध्ये लावण्याचे देखील खूप फायदे आहेत.
डोळ्यांभोवतीचे काळे डाग आणि काळी वर्तुळे दूर करण्यासाठी तूप प्रभावी आहे. डोळ्यांभोवती तूप मालिश केल्याने केवळ काळी वर्तुळेच दूर होणार नाहीत तर डोळ्यांचा थकवाही दूर होईल.
तूप हे निस्तेज त्वचेला नैसर्गिक चमक देते. तूपात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे अ, ड, बी१२, के आणि ई असतात, जे त्वचेला पोषण देतात.
तूप त्वचेची लवचिकता वाढवते आणि त्यामुळे त्वचा लवचिक बनते. यामुळे तारुण्य टिकण्यास मदत होते.
तूप हे एक नैसर्गिक स्क्रबर देखील आहे. तूपासोबत समान प्रमाणात साखर मिसळून मालिश केल्याने, त्वचेत खोलवर शिरते.
त्वचेवर ग्लो यावा म्हणून आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत, वाचा
केवळ तूप लावल्यानेच नाही तर आहारात समाविष्ट केल्याने त्वचा आणि केसांचे पोषण होते. केवळ त्वचाच नाही तर केस निरोगी आणि चमकदार होतात.
कोमट तुपाने टाळूची मालिश केल्याने, केस मऊ होतात. तसेच तुपामध्ये असलेले जीवनसत्त्वे ई आणि अ केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत.
एक चमचा नारळ तेल किंवा ऑलिव्ह ऑइल दोन चमचे तुपासोबत मिसळा. तूप आणि तेल चांगले मिसळेपर्यंत ते गरम करा. मालिश करताना हे मिश्रण केसांना लावा. अर्ध्या तासानंतर शॅम्पू करा. ते तुमच्या केसांना खोलवर कंडिशन करते.
तूप रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि तुमच्या त्वचेचे आणि केसांचे आरोग्य राखते.
केळीच्या पानावर जेवण्याचे फायदे जाणून तुम्हीही थक्क व्हाल, वाचा
तूपाचे फेस पॅक तुमची त्वचा हलकी आणि उजळ करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग एकसारखा होतो. तूपात थोडी हळद पावडर मिसळा आणि चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर धुवा.
देशी तूप बेसन आणि कच्च्या दुधात मिसळून पेस्ट तयार करा. हा पॅक वीस मिनिटे तसेच राहू द्या, नंतर धुवा.
एक चमचा देशी तूप एक चमचा मधात मिसळा आणि थोडे कच्चे दूध घाला. हा मास्क लावा आणि सुकल्यानंतर धुवा. कोरड्या त्वचेसाठी हे एक उत्तम मॉइश्चरायझर आहे.
तूप आणि पाणी समान प्रमाणात मिसळा आणि त्याद्वारे चेहऱ्याला मालिश करा. पंधरा मिनिटांनी धुवा. तुमची त्वचा मऊ होईल.



























































