भारतीय कामगार सेनेची शिवसेनाप्रमुखांना अनोखी मानवंदना, विमानतळावरील 201 कर्मचाऱ्यांनी केले रक्तदान

हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून भारतीय कामगार सेना (विमानतळ विभाग) आणि माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनस-1 येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात विमानतळावरील तब्बल 201 कर्मचाऱयांनी रक्तदान केले.

भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनंत नर यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसेना नेते सुभाष देसाई, बेस्ट सेनेचे अध्यक्ष-आमदार सचिन अहिर, कार्याध्यक्ष अजित साळवी, नगरसेवक जितेंद्र वळवी, शिवानी परब, सोनाली साबे यांनी शिबिराला उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढवला. भारतीय कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस दिलीप जाधव, चिटणीस संतोष कदम, अरुण तोरसकर, सूर्यकांत पाटील, राजा ठाणगे, गोविंद राणे, सहचिटणीस मिलिंद तावडे, नीलेश ठाणगे, जगदीश निकम, विजय शिर्पे, संजीव राऊत, दिनेश पाटील, दिनेश परब, विजय तावडे, सुजित कारेकर आदींची उपस्थिती लाभली. या शिबिरासाठी माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे रक्तपेढीचे रमेश इस्वलकर, कार्यालय प्रमुख एकनाथ मेस्त्राr आणि कार्यकारिणी सदस्य सुदर्शन वारसे यांनी परिश्रम घेतले.