
जपानी कंपनी टोयोटा किर्लोस्कर मोटरने हिंदुस्थानी मार्केटमध्ये आपली पहिली इलेक्ट्रिक कार ‘अर्बन क्रूझर इबेला’ लाँच केली आहे. ही कार मीडियम साईजची आहे. या कारला मारुती सुझुकीच्या ‘इलेक्ट्रिक विटारा’च्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. ही कार एकदा चार्ज केल्यावर तब्बल 543 किलोमीटरपर्यंत धावेल, असा कंपनीने दावा केला आहे. या कारची टक्कर टाटा कर्व्ह ईव्ही, एमजी झेडएस ईव्ही आणि आगामी ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिकशी होईल. कंपनीने अद्याप या कारची अधिकृत किंमत जाहीर केली नाही.

























































