‘एम्स’मध्ये रोबोटच्या मदतीने झाली शस्त्रक्रिया

दिल्लीतील एम्स रुग्णालयात 13 महिन्यांत एक हजार रोबोटिक शस्त्रक्रिया पार पडली. एम्सने केलेल्या दाव्यानुसार, देशात पहिल्यांदा एका मोठ्या संस्थेत रोबोटच्या मदतीने जनरल शस्त्रक्रिया पार पडली. रुग्णांना ही सर्जरी पूर्णपणे निःशुल्क आहे. रोबोटच्या मदतीने सर्जरीमध्ये कमी चीरफाड आणि रक्तस्राव कमी पाहायला मिळाला आहे. 2024 मध्ये 5 नोव्हेंबरला पहिल्यांदा दा विंची रोबोटच्या मदतीने रोबोटिक सर्जरीची सुरुवात करण्यात आली होती, अशी माहिती एम्सच्या सर्जिकल डिसिप्लिन विभागाने दिली आहे.