Jammu Kashmir – किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू

जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा चकमक सुरू झाली. परिसरात तीन ते चार दहशतवादी लपल्याची माहिती मिळते. अखनूर पोलिसांसह जम्मूच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) ची अनेक पथके संपूर्ण परिसरात सखोल शोध घेत आहेत. गेल्या पाच दिवसांपासून या परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू आहे.

दरम्यान, रविवारी रविवारी चत्रू पट्ट्यातील मंद्राल-सिंहपुराजवळील सोनार गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी केलेल्या अचानक ग्रेनेड हल्ल्यात एक पॅराट्रूपर शहीद झाला आणि सात जण जखमी झाले.

किश्तवाडमधील शोध मोहीम अधिक वेगवान करण्यासाठी चत्रू पट्ट्यातील सोनार, मंद्राल-सिंहपुरा आणि आसपासच्या भागात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. या मोहिमेला लष्कराने ‘ऑपरेशन त्राशी-1’ असे नाव दिले आहे. सुरक्षा दल जम्मूच्या राजौरी, पूंछ, सांबा, कठुआ, उधमपूर आणि डोडा जिल्ह्यांसह डझनभर ठिकाणी शोध आणि तपासणी मोहीम राबवत आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.