Chhattisgarh News – स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; कोळसा भट्टीत भीषण स्फोट, 7 कामगारांचा मृत्यू

छत्तीसगडमधील बकुलाही येथे स्टील प्लांटमध्ये गुरुवारी भीषण दुर्घटना घडली. डीएससी कोळसा भट्टीत झालेल्या स्फोटात सातहून अधिक कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. कामगार भट्टीभोवतीचा परिसर साफ करत असतानाच ही घटना घडली. यात अनेक कामगार जखमी झाले आहेत. स्फोट नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

अचानक झालेल्या स्फोटानंतर गरम कोळसा अंगावर पडल्याने कामगार गंभीर भाजले आणि याच त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अनेक कामगार जखमी झाले आहेत. अद्याप मृतांची ओळख पटवण्यात आली नाही. घटनेची माहिती निपानिया चौकी आणि भाटापारा ग्रामीण मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. स्फोटाबाबत अधिक तपास सुरू आहे.