
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ५६ जागांसाठी २२६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.जिल्ह्यातील नऊ पंचायत समितीच्या ११२ गणांसाठी ४४४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
मंडणगड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १२ आणि पंचायत समितीसाठी २० उमेदवारी अर्ज भरले आहेत.दापोलीत जिल्हा परिषदेसाठी २९ आणि पंचायत समितीसाठी ५७ उमेदवारी अर्ज भरले आहेत.
खेड तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ३० आणि पंचायत समितीसाठी ७४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ४४ आणि पंचायत समितीसाठी ७२ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.गुहागर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १६ आणि पंचायत समिती साठी २९ अर्ज भरले आहेत. संगमेश्वर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी २५ आणि पंचायत समितीसाठी ५३ अर्ज भरले आहेत.रत्नागिरी तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी ३८ आणि पंचायत समितीसाठी ५१ अर्ज भरले आहेत. लांजा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १३ अर्ज आणि पंचायत समितीसाठी ३६ अर्ज भरले आहेत. राजापूर तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी १९ अर्ज आणि पंचायत समितीसाठी ५२ अर्ज भरले आहेत.




























































