
केंद्र सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली. मनोरंजन क्षेत्रातील अनेक मान्यवरांना हा सन्मान लाभला आहे. अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर ‘पद्मविभूषण’ जाहीर झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वीच धर्मेंद्र यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. हिंदी सिनेसृष्टीत सहा दशके कार्यरत असलेल्या धर्मेंद्र यांनी 300 हून अधिक सिनेमे केले. बॉलीवूडचे ‘हीमॅन’ अशी त्यांची ओळख होती. ‘हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. पण धर्मेंद्र यांना खूप आधीच हा सन्मान मिळायला हवा होता,’ अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी दिली.
छोटय़ा पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते सतीश शहा यांना पद्मश्री (मरणोत्तर) जाहीर झाला आहे. पार्श्वगायिका अलका याज्ञिक, मल्याळी सुपरस्टार मामुट्टी, अभिनेता आर. माधवन, प्रसोनजीत चॅटर्जी, ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. अनिल रस्तोगी, अभिनेते अरविंद वैद्य यांनाही पद्मश्रीने गौरविले जाणार आहे.




























































