अजित पवारांच्या विमानाला अपघात, VSR Aviation कंपनीची चौकशी होण्याची शक्यता

Shocking The Plane in Which Ajit Pawar Died Had Crashed in 2023 Too

दुर्दैवी विमान अपघातात अजित पवार यांच्यासह आणखी चार जणांचा मृत्यू झाला. या विमानात अजित पवार यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी, एक सहाय्यक कर्मचारी आणि दोन वैमानिक प्रवास करत होते. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

अपघातग्रस्त Learjet 45 हे मध्यम आकाराचे व्यावसायिक जेट विमान असून त्याची निर्मिती कॅनडास्थित Bombardier Aerospace कंपनीने केली आहे. 1995 ते 2012 या कालावधीत अशा सुमारे 640 विमानांची निर्मिती करण्यात आली होती. अपघात झालेलं नऊ आसनी हे विमान दिल्लीस्थित VSR Aviation या कंपनीचं असल्याची माहिती आहे. मात्र, या विमानाचं वय आणि इतर तांत्रिक तपशील तत्काळ उपलब्ध होऊ शकलेले नाहीत.

Directorate General of Civil Aviation (DGCA) च्या नोंदीनुसार VSR Aviation कडे एकूण 18 विमानांचा ताफा असून त्यामध्ये अपघातग्रस्त विमानाचाही समावेश होता. DGCA च्या माहितीनुसार ही कंपनी दिल्लीतील वसंत कुंज परिसरातून कार्यरत आहे.

कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, VSR Aviation ही खासगी जेट चार्टर, विमान भाडेपट्टी आणि एअर अँब्युलन्स सेवा पुरवते. दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि भोपाळ येथून प्रामुख्याने या सेवा दिल्या जातात.

कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या (RoC) नोंदीनुसार, VSR Aviation अंतर्गत VSR Ventures आणि VSR Aero Engineering अशा दोन कंपन्या कार्यरत आहेत. विजय कुमार सिंग आणि रोहित सिंग हे या कंपन्यांचे संचालक असून, रोहित सिंग हे विजय कुमार सिंग यांचे पुत्र आहेत. दोघेही वैमानिक म्हणून प्रशिक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

VSR Aviation च्या संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार, कंपनीकडे 60 हून अधिक वैमानिक असून सुमारे 15 वर्षांचा विमानसेवेचा अनुभव आहे. याशिवाय, विमान व्यवस्थापन, देखभाल, सुटे भाग पुरवठा, विमान वाहतूक सल्लागार सेवा तसेच नागरी विमान वाहतूक मंत्रालय, गृह मंत्रालय, DGCA, DGFT, BCAS, AAI यांसारख्या संस्थांशी समन्वय साधण्याचे कामही कंपनीकडून केले जाते.

या अपघातानंतर Learjet 45 विमानाची सुरक्षितता, तसेच VSR Aviation च्या कार्यपद्धतीबाबत चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.