Pune News – वाघोलीत स्कूल बसची अनेक वाहनांना धडक, मद्यधुंद चालकाला अटक

पुण्यातील वाघोलीत अपघाताची थरारक घटना उघडकीस आली आहे. भरधाव स्कूल बसने चार ते पाच वाहनांना धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहनांना काही अंतर फरफटत नेले. अपघातावेळी बसमध्ये 30 ते 40 विद्यार्थी होते. नागरिकांनी चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. बत्ता वसंत रसाळ असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे.

बायफ रोडवरील एका शाळेची बस बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास 30 ते 40 विद्यार्थ्यांना घरी घेऊन चालली होती. यादरम्यान वाघोलीत मद्यधुंद अवस्थेतील बस चालकाने चार दुचाकी आणि एका कारला धडक देत काही अंतरावर फरफटत नेले. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. नागरिकांनी आरडाओरड करत बसचा पाठलाग केल्यानंतर चालक थांबला. यानंतर संतप्त नागरिकांनी चालकाला चोप दिला. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.