
दादर येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळ आणि सुदाम मंडलिक प्रतिष्ठानच्या विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सुमारे 87 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलित केलेल्या रक्तपिशव्या केईएम रुग्णालयातील रक्तपेढीत जमा करण्यात आल्या आहेत.
सुदाम मंडलिक यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या रक्तदान शिबिराला शिवसेना नेते दिवाकर रावते, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, आमदार अजय चौधरी, उपनेत्या-नगरसेविका किशोरी पेडणेकर, नगरसेवक विशाखा राऊत, भास्कर शेट्टी, सचिन पडवळ, यशवंत किल्लेदार, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, माधवी जोशी, दैनिक ‘सामना’चे नॅशनल हेड (मार्पेट डेव्हलपमेंट) दीपक शिंदे, उपविभागप्रमुख यशवंत विचले, शाखाप्रमुख प्रवीण नरे, अजित कदम, चंद्रकांत झगडे, प्रवीण शेटये, सिद्धार्थ चव्हाण आदींनी भेट दिली. मंडळाच्यावतीने अध्यक्ष शिवराज मंडलिक, अविराज पवार, मच्छिंद्र शेलार, प्रकाश बुचके, अजय कौसाले, बापूसो लोणे, मनोज पुंडे, रामदास लोखंडे, गणेश शेरकर, हरिदास मांजर्डेकर, दादाभाऊ येणारे, रामदास भोसले, अजय खाडे, तुषार भोसले, चंद्रकांत हुलवळे, राजेंद्र बोचरे, राजेंद्र पवार, प्रवीण पुंडे उपस्थित होते.
Dadar Blood Donation Camp: 87 Units Collected for KEM Hospital
A blood donation camp organized by the Meenatai Thackeray Flower Market Traders Association and Sudam Mandalik Pratisthan in Dadar saw an overwhelming response, collecting 87 units of blood for KEM Hospital’s blood bank.




























































