
ICC T20 World Cup 2026 चा धमाका सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी बाकी आहे. पहिला सामना अमेरिका आणि हिंदुस्थान यांच्यामध्ये रंगणार आहे. याच दरम्यान अमेरिकेने आपल्या पंधरा सदस्यीय संघाची घोषणा केली असून कर्णधार पदाची मोठी जबाबदारी हिंदुस्थानी वंशाच्या खेळाडूवर सोपवण्यात आली आहे. गुजरातचा मोनांक पटेल टी20 वर्ल्ड कपमध्ये अमेरिकेचं साराथ्य करणार आहे.
अमेरिकेचा संघ दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्डकपमध्ये आपलं नशीब आजमावणार आहे. यापूर्वी 2024 साली झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये अमेरिकेने पाकिस्तानला पराभवाची धुळ चारून सर्वांनाच धक्का दिला होता. सुपर-8 पर्यंत संघाने मजल मारली होती. त्यामुळे आता होणाऱ्या टी20 वर्ल्डकपमध्ये संघ पहिल्यावहिल्या वर्ल्डकप विजेतेपदासाठी कसोशीने प्रयत्न करण्याची शक्यता आहे. संघामध्ये काही नवख्या खेळाडूंना सुद्धा संधी मिळाली असून 2024 च्या टी-20 वर्ल्डकपमधील 10 खेळाडूंची संघात पुन्हा एकदा वर्णी लागली आहे. शुभम रंजने, मोहम्मद मोहसिन आणि शिहान जयसूर्या या खेळाडूंचा समावेश आहे. अमेरिकेचा संघ ग्रुप A मधून असून अमेरिकेव्यतिरिक्त ग्रुप ए मध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, नेदर्लंड आणि नामेबिया या देशांचा समावेश आहे.
अमेरिकेचा पंधरा संदस्यीय संघ
मोनांक पटेल (कर्णधार), जेसी सिंग (उपकर्णधार), अँड्रिज गौस, शेहान जयसूर्या, मिलिंद कुमार, शान जहांगीर, सयतेजा मुक्कामला, संजय कृष्णमूर्ती, हरमीत सिंग, नोस्तुश केंजिगे, शॅडली व्हॅन शाल्कविक, सौरभ नेत्रावलकर, अली खान, मोहम्मद मोहसीन, शुभम रंजन



























































