सात वर्षांपासून बेपत्ता व्यक्तीस मृत घोषित करण्याचे हायकोर्टाचे आदेश

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

एप्रिल 2003पासून बेपत्ता असलेल्या वडिलांना मृत घोषित करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱ्या मुलाला हायकोर्टाने दिलासा दिला. स्मृतिभ्रंशाचा मेडिकल पुरावा नाही म्हणून मुलाचा दावा खोटा ठरवता येत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत याचिकाकर्त्यांची मागणी मान्य केली.

वडील बेपत्ता झाल्यानंतर मुलाने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र दीर्घकाळ तपास करूनही पोलिसांना सदर व्यक्तीचा कोणताही ठावठिकाणा लागू शकला नाही. अखेर नोव्हेंबर 2011मध्ये पोलिसांनी प्रमाणपत्र देत संबंधित व्यक्ती अद्याप सापडलेली नसल्याचे नमूद केले होते. यानंतर मुलाने वडिलांना मृत घोषित करण्यासाठी सिव्हिल कोर्टात अर्ज दाखल केला होता.