ठसा – प्रशांत वैद्य

बातमी शेर करा :
सामना फॉलो करा

>> माधक डोळे

मराठी गझल म्हटली की, आपल्या डोळ्यांसमोर प्रथम नाव येते ते सुरेश भटांचे. काही कवी असे असतात की ते स्वत: मोठे होतात, स्वत:चे विश्व निर्माण करतात, पण भटांनी आपले आयुष्य जाळून मराठी गझल लिहिणाऱ्यांची सशक्त पिढी महाराष्ट्रात उभारली. ‘जरी या वर्तमानाला कळेना अमुची भाषा… विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’ असे म्हणत भटांनी 1980 च्या दशकात ‘एल्गार’ पुकारला आणि मराठी कवितेच्या क्षेत्रात प्रचंड वादळ निर्माण झाले. शे-दीडशे वर्षे मराठी गझल चाचपडत होती. अगदी अमृतराय, मोरोपंत, माधक ज्युलियन, गंगाधर महाम्बरे, मंगेश पाडगावकर अशा अनेक दिग्गजांनी ‘मराठी गझल’ हा वाक्यप्रकार आपल्या अंगा-खांद्यावर खेळवला, पण गझलला ‘मराठमोळा’ चेहरा मिळवून दिला तो भटांनीच. त्यांनी मराठी गझल लिहिणाऱ्यांची जी पिढी घडवली त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे प्रशांत वैद्य. सशक्त आणि तांत्रिकदृष्टय़ा परिपूर्ण गझल कशी लिहायची याची बाराखडी भटांनी अनेक नवोदित कवींना पाठवली. त्यात प्रशांत वैद्य हेदेखील होते. गेली चाळीसहून अधिक वर्षे ते गझल लिहीत आहेत. सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. लिहिली गझल की टाक फेसबुकवर… पण त्याच्या फार नादी न लागता वैद्य हे मराठी गझलेची साधना करीत आहेत. ‘प्रसिद्धी म्हणजे सिद्धी नव्हे! आधी साधना, नंतर सिद्धी आणि शेवटी आपोआप प्रसिद्धी मिळते’ असे भट नेहमी सांगायचे. त्यांचा हा मंत्र गझल लिहिणाऱया भल्याभल्यांना पचकता आला नाही, पण वैद्य यांनी हा मंत्र अगदी प्राणापलीकडे जपला. ते कधीच प्रसिद्धीच्या मागे लागले नाहीत. म्हणूनच त्यांच्या चाळीस कर्षांच्या दीर्घ प्रकासात ‘अहवाल’, ‘विजांचा सोयरा’, ‘गुलमोहोर फुलताना’ हे तीनच गझलसंग्रह प्रकाशित झाले, पण त्यातील एकेक शेर म्हणजे समुद्राची लाट आहे, अंगार आहे, कादळ आहे. खरे तर गझल लिहिणे म्हणजेच एक मोठी जोखीम असते. ती ज्याला पेलकली तो जिंकला! फक्त तंत्र जमले म्हणजे गझल तुम्हाला कश झाली असे नाही. कारण ती एक साधना आहे. प्रशांत वैद्य ती अविरतपणे करीत आहेत. म्हणूनच त्यांना अंबाजोगाई येथील ‘साधना’ या सेवाभावी संस्थेच्या वतीने ‘गझल साधना जीवनगौरक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा वैद्य यांच्या तपस्येचा, लेखणीचा आणि मराठी गझलेचा गौरक आहे. 7 न 8 फेब्रुवारी रोजी अमराकती येथे होणाऱया तिसऱ्या अखिल भारतीय मराठी गझल संमेलनात हा पुरस्कार दिला जाईल तेव्हा सुरेश भट स्कर्गातून म्हणतील, ‘प्रशांत… क्या बात है… आग बढो!’ वैद्य यांनी गझलेतील सर्क प्रकार अतिशय समर्थपणे हाताळले. ‘कधी न थांग लागला मला तुझा… खरेच सांग आज फैसला तुझा’ असा प्रेयसीला खडा सवाल करणारे वैद्य समाजातील प्रत्येक घडामोडींवर अतिशय परखड भाष्य करतात.

एका ताज्या गझलेत ते म्हणतात-

लोकशाही लागली केव्हाच धक्क्याला
अन् प्रजासत्ताक उरले फक्त नाकाला

वैद्य यांनी केकळ गझल किंवा कविताच नव्हे तर त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनयाच्या क्षेत्रातही उत्तम काम केले आहे. चित्रपट आणि नाटकासाठी गाणी लिहिली. उषा मंगेशकर, अनुराधा पौडकाल, मृदुला दाढे, विजय गटलेकार, डॉ. नेहा राजपाल अशा अनेक दिग्गजांनी त्यांची गाणी गायली असून ‘तुझ्या परी कुणीतरी’ आणि ‘कॉलेजच्या कट्टय़ाकर’ या दोन ऑडिओ सीरिजही प्रकाशित झाल्या आहेत. वैद्य यांनी भटांप्रमाणेच केवळ स्वत:च्याच लेखनाकर लक्ष केंद्रित न करता महाराष्ट्रातील अनेक तरुणांचे हात ‘लिहिते’ केले आहेत. ‘मराठी गझल’ म्हटली की एकेकाळचे अनेक दिग्गज नाव मुरडायचे. त्या सर्कांना पुरून उरत वैद्य यांनी मराठी गझलेचा झेंडा खांद्यावर घेऊन तो सतत फडकवत ठेवला आहे. त्यांच्या या अनोख्या गझल साधनेला शब्दसलाम। त्यांच्याच शब्दात सांगायचे तर-

का पुन्हा मी लेखणीला का लिहाया लावले
हे कुणाचे राहिलेले कार्य आहे चालले?